Exclusive news: आताची सर्वात मोठी न्यूज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्टेज कोसळला.
आताची सर्वात मोठी बातमी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे आज शिवाजी महाराजांची जयंती निमित्त ते कार्यक्रमास गेले होते. श्री राज ठाकरे हे सुखरुप आहेत आणि ते आता त्या ठिकाणापासून निघालेले आहेत. ही घटना गोरेगाव येथे घडली आहे गोरेगावमध्ये आज मनसेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हा स्टेज अचानक खाली कोसळला. त्यात राज ठाकरे देखील खाली पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेदरम्यान पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली असून, स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला आहे. राज ठाकरे सुखरुप असून, ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. 365 दिवस शिवजयंती साजरी करावी- राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे 365 दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. चांदिवली येथे मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावे...